हलगा : खानापूर तालुक्यातील हलगा येथील शहीद जवान संतोष गुरव हे 9 जुलै 2018 मध्ये देशाची सेवा बजावताना शहीद झाले त्यांच्या आठवणीचा उजाळा येणारे स्मारक उभा करण्याचा निश्चय अनेक सैनिक तसेच गावातील जेष्ठ नागरिकांनी व देशप्रेमी यांनी हाती घेतला होता.
यानुसार नंदगड -नागरगाळी या राज्यमार्गावर असलेल्या हालगा मराठी प्राथमिक शाळेच्या बाजूला शाहिद जवान संतोष लक्ष्मण गुरव यांचे स्मारक उभारण्यात आले आहे सदर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा आज 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून पूज्य श्री गोपाळ महाराज हलगा यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी या शहीद जवानाला अभिवादन करण्यासाठी या भागातील देश प्रेमी नागरिक व गावातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्मारक ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे