नंदगड येथे जागृती महिला विकास केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
नंदगड :प्रतिनिधी
आपला भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात महिला व पुरुष दोघांना बरोबरीचे स्थान आहे. पण काही भागात ग्रामीण भागात आजही स्त्रियांवर अत्याचार केला जातो. ते थांबवण्यासाठी स्त्री ने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे. स्त्रियांचे सशक्तीकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास !
तरी आजच्या निबंधा मध्ये आपण हाच विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजेच ” महिला सशक्तिकरण ” स्त्री घर आणि काम किंवा नोकरी अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत असते. त्या दरम्यान तिच्यावर अनेक अत्याचार होतात व अनेक समस्यांना सुद्धा तिला तोंड द्यावे लागते. आजच्या स्त्रिया ह्या पहिल्या सारख्या आबला राहिल्या नाहीत. असे विचार महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. रविवारी नंदगड येथे जागृती महिला विकास केंद्राच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन पार पडला यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आजच्या युगात स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहे. तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने महिलांना पाहिजे तेवढा योग्य तो मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी स्त्री सशक्तीकरण करणे अत्यंत गरजेचे बाब आहे. प्रत्येक स्त्री ही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र असली पाहिजे. नारीशक्तीची रूपे अनेक आहेत. प्रत्येक नारी ही वेगवेगळ्या रूपामध्ये समाजामध्ये नांदत असते पत्नी, आई तर कधी बहीण अशी अनेक नाती जपणारी रूपे आजच्या समाजामध्ये दिसून येतात. त्यामुळे नारी शक्तीला इतिहास काळापासून आजवर अधिक महत्त्व प्रेरणास्थान आहे याचा आपण सर्वांनी आदर राखला पाहिजे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात जागृती महिला संघाच्या वतीने येतील कॉन्व्हेंट स्कूलच्या आवारात भव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्रीमान विठ्ठल हलगेकर व त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी हलगेकर सह अनेकांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नंदगड येथील जेष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य पि.के. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मारिया कृपा सोसायटीच्या श्रीमती नेहा आरोग्या, ग्रामपंचायत अध्यक्ष नर्मदा जोडंगी आदीवक्ते व भाजप नेते चेतन मनेरिकर, आदी वक्ते आकाश अथणीकर, ग्रामपंचायत सदस्य व भाजप नेते विजय कामत, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बोटेकर, रवी पाटील, राजेंद्र लक्केबेलकर सह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी अधिवक्ते चेतन मनेरिकर यांनीही पूर्वीच्या काळातील स्त्री आणि आजच्या काळातील स्त्री याबद्दल बदल याबद्दल माहिती देत स्त्रियांना आज मानाचे स्थान देऊन 50 टक्के आरक्षण दिल्याने चूल आणि मूल इतकेच मर्यादा न राहता समाजात सर्व थरात महिला अग्रेसर असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी जागृती महिला केंद्राच्या वतीने श्री विठ्ठल हलगेकर दांपत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. महिलांनी मोठ्या उत्साहाने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील व जागृती महिला संघाच्या प्रतिनिधी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.