खानापुर::
प्राथमिक विभागात जाधव, देसाई, ठोंबरे तर माध्यमिक विभागात संचिता पाटील प्रथम
महाविद्यालयीन विभागात प्रियतम बडिगेर, साक्षी गुरव ठरले अव्वल
खानापूर :
येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत प्राथमिक विभागातून बाळकृष्ण म. जाधव, रघुवीर रा. देसाई (दोघेही इदलहोंड सरकारी मराठी प्राथ. शाळा) आणि धनश्री स. ठोंबरे मिलाग्रीज चर्च शाळा या तिघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. माध्यमिक विभागात संचिता शरद पाटील (ताराराणी हायस्कूल) तर महाविद्यालयीन विभागात प्रियतम एम. बडिगेर (मणतुर्गा) आणि साक्षी पांडुरंग गुरव (खानापूर) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत तिन्ही गटातून बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक विभागातील विजेते : निखिल कुंभार, प्रणाली चोपडे (दोघेही इदलहोंड शाळा) द्वितीय, समीर पाखरे, अदिती चोपडे (दोघेही इदलहोंड शाळा) तृतीय, सोनाली दळवी (कबनाळी शाळा), युवराज साबळे (मिलाग्रीज चर्च शाळा) चौथा, साक्षी नामदेव गुरव (मिलाग्रीज चर्च शाळा), साक्षी कृष्णा चोपडे (इदलहोंड शाळा) पाचवा, प्रांजली पाटील, आशिष हलगेकर (दोघेही मिलाग्रीज चर्च शाळा), समर्थ देसाई (नेरसे शाळा) सहावा, जान्हवी पाटील, मोहिनी पाटील, सुहेल बडिगेर, श्रीधर सुळकर (सर्वजण मिलाग्रीज चर्च शाळा) यांनी सातवा क्रमांक पटकाविला.
माध्यमिक विभाग : विश्वास कृष्णा मादार (म. मं. हायस्कूल खानापूर), अक्षय सोनू गावकर (माऊली विद्यालय कणकुंबी) द्वितीय, भरतेश वि. चलवादी (म. मं. हायस्कूल खानापूर), मृदुला मनोहर गावडे (ताराराणी हायस्कूल) तृतीय, पौर्णिमा गुंडू नाईक (माऊली विद्यालय कणकुंबी) चवथा, अनिकेत न. पाटील (म. मं. हायस्कूल खानापूर), सान्वी रा. कोळी, मधुरा मारुती गावडे (दोघेही ताराराणी हायस्कूल), पायल प्र. लाटगावकर (एमएचपीएस तिवोली) पाचवा, कृतिका वि. बाळेकुंद्री, सुप्रिया चां. पाटील (दोघिही ताराराणी हायस्कूल), अश्विनी प. गावकर (शिरोली हायस्कूल) सहावा, प्रगती सु. होवेकर (ताराराणी हायस्कूल), युवराज अ. कुंभार (म. मं. हायस्कूल खानापूर), रीना ल. सहदेवाचे (गणेबैल हायस्कूल), संतोष प. गावडे (माऊली हायस्कूल कणकुंबी), महिमा म. देसाई (इदलहोंड हायस्कूल), रुपेश प. कुट्रे (म. मं. हायस्कूल खानापूर) यांनी सातवा क्रमांक पटकाविला.
महाविद्यालयीन विभाग : आरती म. पाटील (हारुरी), पौर्णिमा रु. मांगीलकर (ढोकेगाळी) द्वितीय, आदित्य अ. कांबळे (केएलई कॉलेज खानापूर) तृतीय, आरती बेटगिरकर (केएलई कॉलेज खानापूर), साक्षी बेकवाडकर, नताशा पाटील दोघीही (म. मं. कॉलेज खानापूर), विनायक चौगुले (खानापूर) उत्तेजनार्थ. त्यांनी पटकावला आहे सदर विजेत्या स्पर्धकांचा सोमवार दि. 27 रोजी शिवस्मारक येथे होणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.