DSC_0869


कृषी पतीन सहकारी संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नूतन इमारत

जांबोटी:
सहकार क्षेत्र हे दिन दलित व गोरगरिबांच्या हितावह काम करते शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी या सहकार क्षेत्राने यापूर्वी अनेक वेळा मोठी भूमिका बजावली आहे. राज्यातील भाजप सरकारने यापूर्वी दोन तीन वेळा कर्जमाफीचे धोरण राबवल्याने कृषीपतींन सहकारी संघाशी जोडलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जांबोटी -निलावडे या कृषीपतीन सहकारी संघाला सुरुवातीच्या काळात बरीच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. पण त्यामध्ये सुधारणा करून आज या कृषी पतीन संघाने स्वतःची इमारत उभारून या भागातील शेकडो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेतले. यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचे विचार कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्ष व भाजप नेत्या श्रीमंत राणी सरकार धनश्री करणसिंह सरदेसाई- जांबोटिकर यांनी व्यक्त केले. जांबोटीआणि निलावडे संलग्न असलेल्या जांबोटीआणि नीलावडे कृषी पतीन सहकारी संघाच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.


यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले तर अध्यक्ष काउंटरचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,काऊंटर उद्घाटन श्रीमंत सरकार करणसिंह सरदेसाई, नाम फलकाचे अनावरण हनुमान सोसायटीचे संस्थापक चेअरमन विश्वनाथ डीचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई, जांबोटी मल्टी प्र. सोसायटीचे चेअरमन विलास बेळगावकर, जय हनुमान सोसायटीचे चेअरमन शाहू राउत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले तर महेश गुरव, विठ्ठल देसाई, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे , निंगाप्पा पाटील जयवंत देसाई आदींच्या हस्ते विविध दैवतांच्या प्रतिमांचे पूजन झाले.
त्यावेळी उद्घाटक यांना त्यांना बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षात कृषि पतीन सहकारी संघाचे जाळे विस्तारित करण्यासाठी केले आहेत.राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पतधोरणात सुधारणा केली आहे प्रारंभीच्या काळात बारा कोटी रुपयांच्या होत असलेल्या तालुक्यातील एकूण संस्थाना बळ देऊन आज ८० कोटी पर्यंत पोहोचवण्याचे काम आपण केले आहे. शिवाय जांबोटी नलावडे या कृषी पतीन सहकारी संघाच्या प्रगतीसाठी ही वेळोवेळी आपले सहकार्य कायम राहिले आहे. अशा या सहकारी संघाचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी संजय कुबल प्रमोद कोचेरी बाबुराव देसाई आदींची भाषणे झाली. कार्यक्रमात सूत्रसंचालन महेश सडेकर यांनी केले. स्वागताध्यक्ष जयवंत देसाई यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक मंडळी विविध कृषी पतील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ उपस्थित होते
.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us