खानापूर : बेळगावहून खानापूर कडे येत असताना निटूर फाट्या नजीक एका अज्ञात वाहनाने ठोकल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे .रात्री बेळगाव येथील आपले काम संपवून आपल्या घरी येत असताना बेळगाव – खानापूर महामार्गावरील निट्टूर क्रॉस जवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठीमागून ठोकल्याने खानापूर तालुक्यातील तळेवाडी येथील राजु सातेरी धबाले (वय अंदाजे 42 वर्षे) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला झाल्याची घटना घडली आहे
या बाबत मिळालेली अधिक माहिती असी की, राजु सातेरी धबाले हे आपल्या पत्नीच्या गावी गणेबैल येथे सासरवाडीला रहात होते. व तेथून दररोज गणेबैल येथून उद्यमबाग येथे कामाला येजा करतं होते. नेहमीप्रमाणे उद्यमबाग येथील आपले काम संपवून घरी येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर मारली असता ब्रीजवरील साईडला असलेल्या भिंतीवर आढळल्याने डोकीला मार बसून जागीच ठार झाले, यांच्या पश्चात तीन मुली व पत्नी असुन घडलेल्या या दुदैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा व शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती.
खानापूरचे सीपीआय रामचंद्र नाईक, कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर, कॉन्स्टेबल मंजूनाथ मुसळी यानी पुढील चौकशी व अज्ञात वाहनाचा तपास खानापूर पोलीस करत आहेत.