मनतूर्गा ता. खानापूर येथे श्री गजानन गावडू पाटील (भाजपा सेक्रेटरी) पुरस्कृत “भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे”आयोजन रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सायं 7वा.आयोजित करण्यात आल्या आहेत.
खास महाशिवरात्री तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने सदर स्पर्धा लहान आणि मोठा गट अशा दोन गटात होणार असून खानापूर तालुका पातळीवर मर्यादित राहणार आहेत. मोठ्या गटातील विजेत्याना अनुक्रमे 8000,6000,4000 अशी आकर्षक 7 बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तर लहान गटाकरीता( 12 वर्षाखालील) अनुक्रमे 5000,4000,2000 ती पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धांचे उद्घाटन भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते होणार असून यावेळी भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, बाबुराव देसाई सह तालुक्यातील भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9945110192, 99458499985 शी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.