IMG-20230305-WA0001

आवरोळी-बिळकी रुद्रस्वामी मठात पुण्यराधना सोहळा

खानापूर :  भारतीय संस्कृतीला धर्म परंपरा लाभलेली आहे. म्हणून पुरातन काळापासून रीती रिवाज शपथ देशाला समृद्ध बनवण्याचे काम या परंपरेने केले पाश्चात संस्कृतीत आणि भारतीय संस्कृती फारच फरक आहे.भारतीय संस्कृतीत मातेला पहिल्या गुरुचा मान आहे. प्रत्येक घरातील माता आपल्या मुलांवर बालवयातच चांगले संस्कार करून त्याच्या संगोपनात महत्त्वाची भूमिका पार पाडते. मातांकडून सदाचार आणि संस्कारांचे बाळकडू मिळत असल्याने आपली संस्कृती संपूर्ण जगाला आदर्श ठरली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्य उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केले.
आवरोळी-बिळकी (ता. खानापूर) या गावांच्या हद्दीतील रुद्रस्वामी मठाचे पीठाधीश शांडिल्यश्वेर महास्वामींच्या सहाव्या पुण्याराधना कार्यक्रमात विजयेंद्र बोलत होते. ते म्हणाले, आवरोळी मठाने अन्नदासोह, ज्ञान दासोह आणि अक्षर ज्ञान पुरविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. शिवाय या मठाच्या माध्यमातून अनेक असताना जोडण्याचे काम केले आहे त्यामुळे भविष्यात या अवरोळी रुद्रमठाची
महती वाढेल असे विचार त्यांनी मांडले.

गोशाळेला दोन एकर जागा देणार

तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर म्हणाले, या मठाचे कार्य जात आणि धर्माच्या पलीकडे आहे. सर्वधर्मीयांना या मठाने आपलेसे केले आहे. मठात बांधण्यात येणार असलेल्या गोशाळेला संस्थेच्या वतीने दोन एकर जागा देऊ असे आश्वासन दिले.

केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष माजी खा. प्रभाकर कोरे म्हणाले, ग्रामीण भागात मठांच्या माध्यमातून प्राचीन संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला करून दिली जाते.माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, बंगलोर बीएमआरडीए आयुक्त गिरीश होसूर, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सुभाष गुळशेट्टी, विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी पाटील, सुंदर कुलकर्णी, जोतिबा रेमाणी, दशरथ बनोशी, के. पी. पाटील तसेच विविध मठाधीश उपस्थित होते. विवेक कुरगुंद यांनी सूत्रसंचालन केले. रुद्रस्वामी मठाचे विद्यमान मठाधीश चन्नबसव देव यांनी स्वागत केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us