इवलेसे रोप लावियेले दारी! त्याचा वेलू गेला गगनावरी! या उक्तीप्रमाणे शिक्षक ते मुख्याध्यापक व तेथून एक समाजसेवक म्हणून सहकार क्षेत्राचे उत्तम जाळे विनवत राजकीय सामाजिक क्षेत्रात मजल मारली आज खानापूर तालुक्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या जन माणसात तालुक्याचे भावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे तोपिन कट्टी महालक्ष्मी ग्रुपचे आधारवड तसेच माऊली विद्यालय गर्ल गुंजी शाळेचे मुख्याध्यापक सरळ साधे व प्रेमळ व्यक्तिमत्व श्रीमान विठ्ठल सोमांना हलगेकर आज आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात
श्रीमान विठ्ठल हलगेकर हे 1988 साली गर्लगुंजी येथील माऊली विद्यालयात विज्ञानाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. सुरुवातीच्या काळात घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघड असतानाही जिद्द व मेहनत यावर त्यांनी 1986 मध्ये आपले पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. व विनाअनुदानित असलेल्या गर्लगुंजी येथील माऊली विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले मात्र तब्बल आठ वर्षे विना पगार त्यांनी या शाळेमध्ये आपली प्रामाणिक सेवा बजावली. तोपिनकट्टी-गर्लगुंजी हा त्यांचा सायकलीचा नित्य प्रवास होता. आपला मुलगा शिक्षक बनतोय या मोठ्या आकांक्षेने आईने त् पदरमोड करून सायकल दिली. बाप एक गिरणीकार होता. काबाडकष्ट करून जीवनकंठत करत त्यांना लहानाचे मोठे केले. आई-वडिलांच्या कष्टाचे फळ व सर्वसामान्यांच्या जगण्याचे मूळ लक्षात घेता पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांनी गावात केवळ दोन रुपयाचा फंड सुरू करून महालक्ष्मी ग्रुपला सुरुवात केली. दोन रुपयाच्या फंडातून तीस हजार रुपयांचा निधी जमवला आणि आज महालक्ष्मी ग्रुप संस्था 400 कोटीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे 1995 मध्ये महालक्ष्मी ग्रुपने महालक्ष्मी मल्टीपर्पज सहकारी संघाची स्थापना केली. त्याच काळात श्रीमान विठ्ठल हलगेकर यांच्या प्रदीर्घ सेवेचे फळ मिळाले व त्यांना माऊली विद्यालयात परमनंट पगारी शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
खऱ्या अर्थाने त्यांना पगारी शिक्षक म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ्यांच्या सासर्याने त्यांना एक एम-80 गाडी भेट दिली होती. अन त्यांचा त्या वेळेचा तो आनंद वेगळाच होता, असे नेहमी सर सांगतात. शाळेला अनुदान मिळाल्यानंतर या संस्थेचे संस्थापक जयसिंगराव पाटील यांच्या अथक परिश्रमातून शाळेची भरभराट होत गेली. श्रीमान विठ्ठल हलगेकर हे विज्ञानाचे शिक्षक होते. त्यांच्या अनुभवातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले. आज त्यांनी शिकवलेले अनेक विद्यार्थी उच्चस्त पदावर कार्य करत आहेत. बघता बघता त्यांच्या या सेवेची 34 वर्षे पूर्ण झाली एकीकडे शिक्षकी सेवा बजावताना आपल्या शिक्षेची सेवेला कधीही खंड न करता महालक्ष्मी ग्रुप चा वटवृक्ष वाढवण्यातही त्यांनी कधी मागे राहिले नाहीत. महालक्ष्मी ग्रुपच्या माध्यमातून गावात मंडळ पंचायत पासून ग्रामपंचायती आपल्या ग्रुपच्या नेतृत्वाखाली अविरतपणे समाजसेवेचे व्रत घेऊन अनेकांना त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. म्हणूनच आज 18 पकड जातीच्या मावळ्यांना घेऊन एक महालक्ष्मी ग्रुप त्यांनी चालवताना स्वाभिमान उंचावतो. साधी राहणी अन उच्च उच्चारश्रेणी या उक्तीप्रमाणे हलगेकर यांनी आज शांतिनिकेतन पब्लिक शाळा लैला साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल यासह अनेक उद्योग व्यवसायात त्यांनी मागे राहिले नाहीत. म्हणूनच आज महालक्ष्मीचा वटवृक्ष ब्रम्हांडा इतका डोलावत खानापूर तालुक्यातील एक आदर्शवंत ठरला आहे.
श्रीमान विठ्ठल हलगेकर यांनी जीवनात अनेक चांगले आणि कटू प्रसंग ही अनुभवले त्यांच्या आयुष्यात अर्धांगिनी म्हणून आलेल्या त्यांच्या धर्मपत्नी यांची ही साथ त्यांच्या यशस्वी वाटचालीस तितकीच कारणीभूत आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेची दखल घेता दोन वर्षांपूर्वी मुख्याध्यापक पदाची वर्णी लागली. पण त्यांनी कधीही या पदाचा मोह बाळगला नाही. साधे राहणीमान कायम अंगी बाळगून आपण एक हाडाचा व प्रामाणिक शिक्षक असल्याचा ते नेहमीच उल्लेख करतात. अशा या दूरदृष्टी नेतृत्वाला आज 31 जानेवारी 2023 रोजी सेवेतून सेवानिवृत्ती मिळत आहे. एकीकडे शिक्षकी सेवेतून मुक्त होत असताना आता त्यांनी राजकीय प्रवासातही आपली मजल मारली आहे. मागील निवडणुकीत एक शिक्षक असतानाही समाजसेवेचा विडा हाती उचलून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. परंतु पक्षातीलच काही स्वकीयांच्या निमुळत्या धोरणामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पण या पराभवाला न खचता त्यांनी कधीही मागे राहिले नाहीत. सतत जनमानसात राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. नुकताच 7 जानेवारीला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असा शिवगर्जना महानाट्य खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य व शिवभक्तांना पर्वणी देणारा ठरला. म्हणूनच आज श्रीमान विठ्ठल हलगेकर हे खानापूर तालुक्याचे एक भावी नेतृत्व म्हणून टॉप वन मध्ये दिसून येत आहेत.
आज त्यांच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ते सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुख शांती समाधान तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभो व राजकीय क्षेत्रातही त्यांना तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी महालक्ष्मी देवीच्या कृपा आशीर्वादाने येवोत, हीच सदिच्छा व त्यांच्या सेवानिवृत्तीस कोटी कोटी शुभेच्छा