खानापुरात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेचा सांगता समारंभ:
खानापूर प्रतिनिधी : आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार तालुक्याच्या खेड्यापाड्यात शिकणारी अनेक मुले, मुली चांगल्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जाणे जेकरीचे बनले आहे. शिक्षक आपल्या विषयानुसार ज्ञानांकन करत असले तरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि गुणात्मक शिक्षणाचे बळ देण्यासाठी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून खानापूर तालुक्यात व्याख्यानमालांचा आयोजन केले जात आहे . मी पुणे स्थित असलो तरी खानापूरच्या मातीशी माझी नाळ जुंपलेली आहे. त्यामुळेच आपल्या तालुक्यातील विद्यार्थी उज्वल व देशाच्या पातळीवर नामांकित व्हावेत याच दृष्टिकोनातून दहावी परीक्षेत गुणात्मक ज्ञान मिळावे यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करून एक छोटासा प्रयत्न हाती घेतला जात आहे. मात्र हे कार्य एका व्यक्तीमुळे होऊ शकत नाही, याकामी अनेकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. गेल्या 14 वर्षापासून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या कार्यात खानापूर, बेळगाव भागातील अनेक विद्यमान मुख्याध्यापक, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग वटवृक्षासारखी साथ य दिली आहे. त्यामुळेच 14 वर्षे हे कार्य यशस्वीरित्या पुढे नेताना आनंद होत असल्याचे विचार ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षपिटर डिसोजा यांनी व्यक्त केले. रविवारी खानापुरात 2022- 23 शैक्षणिक वर्षातील दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
येथील लोकमान्य भवन मध्ये आयोजित या कार्यक्रमात दीप प्रज्वलन बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट स्वप्निल व्ही.टी बैलहोंगलचे तहसीलदार जयदेव अष्टगिमठ, उद्योजक मारुती वाणी, पुणे. पंप इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक अल्फाई मेंटेरिओ, निवृत्त मुख्याध्यापक पि.के चापगावकर, सचिन पाटिल,नारायण पाटिल, विनायक गुरव, लोकमान्य ग्रुपचे संचालक पंढरी परब, सचिन पाटील, रामचंद्र निलजकर, मंजुनाथ आळवणी, उद्योजक शांताराम बडसकर आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 2022-23 दहावीच्या परीक्षेला अनुरूप व मार्गदर्शन ठरेल अशा मॉडेल प्रश्नपत्रिकाचे प्रकाशन खानापूर गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची संगरगाळी एस जे सेंटर स्कूलचे प्रिन्सिपल मोतीराम बर्डेस्कर, आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी खानापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक व विविध क्षेत्रात प्रावीण मिळवलेल्या म्हणी यांचा श्रीफळ शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय 2021_22 या शैक्षणिक वर्षात खानापूर तालुक्यात उच्चांक साधलेल्या खानापूर तसेच बेळगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना डेप्युटी कमांडंट स्वप्नील वि.टी म्हणाले, जीवनात जिद्द व चिकाटी ही फार महत्वाची आहे. कोणतेही कार्य करण्यासाठी ध्येय व स्वप्न अंगी बाळगणे गरजेचे आहे. आपणाला आवडेल अशा विषयाच्या बाजूने जाण्यासाठी प्रेरित झाले पाहिजे. जीवनात निराशा जनक गोष्टीला बाहेर ठेऊन हाती घेतलेले काम आपण नक्कीच जिंकू असा आशाभाव ठेवून भरारी घेतल्यास यश नक्कीच मिळते असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी खानापूरच्या गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची, लोकमान्य चे संचालक पंढरी परब बैलहोंगल तहसीलदार जयदेव अष्टगीमठ, खानापूर म. ए. समितीचे जेष्ठ नेते निरंजन सरदेसाई, अल्फाई मेंटेरिओ आदींनी यावेळी विचार मांडले.
जीवन गौरव, समाज रत्न, ज्ञानरत्न पुरस्काराने अनेक जण सन्मानित
ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार यावेळी वितरित करण्यात आले. यापैकी जीवन गौरव पुरस्कार कणकुंबी येथील निवृत्त शिक्षक व नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असलेले अर्जुनराव कळेळकर यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘समाज रत्न पुरस्कार’ तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर याना तर ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ खानापुरची कन्या व सध्या बेंगलोर येथील एग्रीकल्चर सायन्स युनिव्हर्सिटी मध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या डॉ. स्नेहल संजय गिरी, बेलगुंदी येथिल शिक्षिका स्नेहल जोतिबा पाटील, बेलगाम रेणुका शुगर्स चे उपाध्यक्ष गोविंद मिसाळे यांना बहाल करण्यात आला.
कार्यक्रमात मलप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत गाईलेप्रास्ताविक ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बी. जे. बेळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन महेश सडेकर, एस.पी. धबाले यांनी केले.तर आभार प्रतिसाद उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिसादचे सचिव व्ही बि. होसूर, सहसचिव एन. एम. देसाई, एम. एफ. होणगेकर, एम.डी पाटील, पी. एन. आळवणी आदींनी विशेष परिश्रम घेतले.