IMG-20230127-WA0107

खानापूर; बैलहोंगल तालुक्यातील एम.के हुबळी येथे भारताचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजी यांची जन संकल्प महासभा शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.

या सभेला खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते व लैला साखर कारखान्याचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर लाईव्ह सी बोलताना दिली. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशाला महासत्ताक बनवण्यासाठी गेल्या 10 ते 15 वर्षापासून सुरू असलेली विकासाभिमुख कामे व या कामांसाठी खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम करणारे भारताचे गृहमंत्री व भाजपचे जेष्ठ व चाणक्य असे व्यक्तिमत्व श्रीमान अमित शहाजी यांची जन संकल्प अभियान सभा ही संपूर्ण बेळगाव जिल्ह्याला प्रेरणा देणारी ठरणार आहे. बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी यावेळी सक्षम राहणार असून कर्नाटकातही येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार येणार आहे. त्या दृष्टीने सर्व थरातून भाजपचे कार्यकर्ते पक्ष संघटनेच्या कार्याला लागले आहेत.

खानापूर तालुक्यातही भारतीय जनता पार्टी पूर्णतः सक्षम बनली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंघ राहून या वेळी भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. त्या दृष्टीने खानापूर तालुक्यातून सन्माननीय अमित शहाजी यांच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी खेड्यापाड्यात जनजागृती करण्यात आली असून अनेक कार्यकर्ते स्वइच्छेने व प्रेरणेने या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्रीमान विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी दिली

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us