खानापूर : खानापूर हेस्कॉमतर्फे तालुक्यातील ग्राहकांच्या तक्रारी तसेच समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी (ता. १७) सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावचे कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार चिकाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्टेट बँकेजवळील हेस्कॉमच्या उपविभागीय कार्यालयातही बैठक होणार आहे. लोकांनी बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडाव्यात, असे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता कल्पना तिरवीर यांनी केले आहे.