खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल येथील एका युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. सदर युवकाचे नाव महादेव सुभाष कोलेकर वय वर्षे 17 असे आहे सदर युवकाच्या घरचे लोक शेताकडे गेले असता त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उशिरा लक्षात आली. सदर युवक नंदगड येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाले असून पोलीसांनी जागी जाऊन पंचनामा केला आहे. खानापूर येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर युवकांच्या आत्महत्या मागचे नेमके कारण मात्र कळले नाही पोलिस याचा तपास करत आहेत. त्याच्या पश्चात आई वडील बहीण आहे महादेव हा त्यांचा एकुलता मुलगा होता. शाळेत हुशारही होता चुलत भाऊ चे लग्न ठरल्याने त्या लग्नासाठी तो बरीच धावपळ करत होता. परंतु अचानक त्याने गळफास घेण्यामागचे कारण मात्र कळले नाही.