15 हजार भाविकांची उपस्थिती शक्य; विविध कार्यक्रमाचे आयोजन
आवरोळी ता. खानापूर येथील श्री रुद्रस्वामी मठावर परमपूज्य लिंगकैय शांडील्य महाराज यांचा 6वा. पुण्यराधना कार्यक्रम येत्या 02 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी श्री आवरोळी रुद्रस्वामी मठावर पूर्वनियोजित सभा पूज्य श्री बसव देवरु यांच्या दिव्य सानिध्यात पार पडली.
यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील,माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी, दशरथ बनोशी, ज्योतिबा भर्मपनावर,,हनुमंत पाटील, सदानंद पाटील यासह अनेक जण उपस्थित होते.यावेळी येत्या 02 मार्च रोजी होणारा पुण्यराधना कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या कार्यक्रमासंदर्भात रूपरेषा यावेळी ठरवण्यात आली.यावेळी बोलताना भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, हा धार्मिक कार्यक्रम आहे यामध्ये राजकारण आता सर्व पक्षांना समावेश करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक भागातून भाविकांची उपस्थिती कशी आणता येईल यावर नियोजन तसेच बसेसची सोय पार्किंगची सोय व्यासपीठाचा कार्यक्रम आधी नियोजनबद्ध झालं पाहिजे यासाठी आपले सहकार्य असेल असे सांगितले.लिंगैक्य श्री शाडील्य महाराज यांचे या मठाच्या उज्वलासाठी मोठे योगदान आहे. त्यांचा हा 6वा. पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करताना दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षीही अनेक स्वामीजींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, कार्यक्रमासाठी विशेष करून भाजपा राज्य उपाध्यक्ष विजयेंद्रा येडुरप्पा हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, दशरथ बनोशी यांनीही या कार्यक्रमाची रूपरेषा संदर्भात आपले विचार मांडले.
यावेळी पूज्य श्री चनबसव देवरू म्हणाले, रुद्र स्वामी मठ हा अनेकांच्या सहकार्यातून प्रगतीच्या दिशेने पुढे चालला आहे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून भाविकांनी या मठाच्या उन्नतीसाठी सहकार्य केले आहे लिंगैक्य श्री शांडील्य महाराजांचा सहावा पुण्यतिथी सोहळा हा सर्वांच्या उपस्थितीत झाला पाहिजे.यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले.
या निमित्ताने दि. 02 रोजी सकाळी 9.30 वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभरात अनेक स्वामीजींच्या तसेच राजकीय मंडळींच्या उपस्थितीत धर्मा सभा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी खानापूर तालुक्यातील स्वामी भक्ताने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे