खानापूर; तालुक्यातील जवळपास 150 हून अधिक नाभिक समाजाचे कार्यकर्ते कुडलसंगम या ठिकाणी अपना हडपद समाजाच्या समुदाय भवन उद्घाटन व धार्मिक सभेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोंमाई सह राज्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. खानापूर तालुक्यामध्ये हडपद मोठा समाज आहे. या समाजाला प्रेरणा देण्यासाठी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व लैला साखर कारखान्याचे चेअरमन भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी त्यांना कुडलसंगम पर्यंत जाण्यासाठी वाहनांची सोय व त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यासाठी सहकार्य केले आहे. सदर समाजाच्या 150 हुन अधिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी विशेष वाहनातून कुडलसंगम कडे रवाना झाले. यावेळी लैला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिला. समाजाला दिलेल्या सहकार्याबद्दल समाजाच्या वतीने लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खानापूर तालुका हडप समाजाचे अध्यक्ष इराणा संपगावी, सोमू नावलगी,महादेव यजर्वी, श्रीकांत हम्पन्नवर, मल्लेशी हडपद आधी उपस्थित होते.