गेल्या दोन चार वर्षापासून भारतीय सेनेत भरती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही अपयश आले. घरची परिस्थिती हलाखीची असताना नोकरी धंदा काहीतरी करावा या हेतूने रात्रंदिवस परिश्रम घेतले. पण भरतीमध्ये यश आले नाही. अलीकडेच त्या युवकाने भारतीय सेनेतील परीक्षाही दिली होती पण परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने त्याच्यावर मानसिकताण व नाराजी पसरली होती. त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावाखाली वावरत होता. अथक परिश्रम करूनही आपल्याला यश येत नसल्याच्या नैराशेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील शिवठाण येथे सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव ज्ञानेश्वर लुमाना शिरोडकर वय 22 वर्ष राहणार शिवठाण असे आहे. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून भारतीय सेनेत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. बारावी पास झाल्याने नंदगड येथील सैनिक ट्रेनिंग स्कूलमध्ये तो सरावही करत होता. पण त्या सरावानंतरही परीक्षेत अपयश आल्याने त्या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.
खानापूर तालुक्यातील दोन दिवसात दुसरी घटना अलीकडे युवकांची बेरोजगारी व विविध कारणामुळे आजचा युवक भरकटला गेला जात आहे. एकीकडे नोकरी नाही. तर दुसरीकडे लग्न जमत नाही. अशामुळे अनेक युवक नैराशीच्या खाली ग्रासले आहेत. त्यामुळे अनेक युवकांच्या समोर उभ्या जीवनाची मोठी ढाल निर्माण झाली आहे. रविवारी खानापूर तालुक्यातील कौदल येथील महादेव कोलेकर नामक युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे शिवठाण येथील युवकाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे . युवकांच्या आत्महत्येचा हा प्रश्न गंभीर आहे.परंतु युवकांनी अशा पद्धतीचे निर्णय घेणे चुकीचे आहे. धैर्य व सामर्थ्य समोर ठेवून परिस्थितीला सामोर घेऊन उत्तम जीवन जगणे हेच खरे पोषार्थ आहे याचा आजच्या युवा पिढीने विचार करणे काळाची गरज बनली आहे.