बेळगाव :
खानापूर तहसीलदार कार्यालयात यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्य केलेल्या तसेच बेळगाव येथील सहाय्यक आयुक्त अधिकारी श्रीमती रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते. त्यांनी देसूर या ठिकाणी अनेक वर्षे तलाठी म्हणून कार्य केले होते. सध्या ते बेळगाव ते प्रथम दर्जा लिपिक म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांना महसूल निरीक्षक म्हणून भरती मिळाली होती असेही समजते
आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची खबर सर्वत्र पसरली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळले नाही बेळगाव एपीएमसी पोलिसाचा तपास करीत आहेत.