IMG-20230203-WA0048

चिकमुनवली अरूढ मठात रथ पूजन
खानापूर( प्रतिनिधी); खानापूर तालुक्यातील चिकमुनवली येथील अरूढमठात रथ पूजन कार्यक्रम शुक्रवारी थाटात संपन्न झाला. या प्रसंगी दिव्य सानिध्य मठाधीशांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवटगिमठ, भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजपाचे अध्यक्ष संजय कुबल, सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवठगी मठ म्हणाले समृद्ध भारत बनवण्यासाठी महात्म्यांचे योगदान महत्त्वाचे आहे समृद्ध भारत देश बनवण्यासाठी मठ मंदिरे ही एकीची व धार्मिकतेची कामे करतात अशा मंदिरांना प्रोत्साहन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे देशात असलेल्या भाजप सरकारनेही मत मंदिरांच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखले आहेत असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आज जनमानसात बसलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी अनेक विकासाभिमुख योजना आखल्या आहेत. त्या योजना तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.खऱ्या अर्थाने समृद्ध देश बनवण्यासाठी स्वामीजींचे मठाधीश यांचे योगदान मोठे आहे. आगामी काळात खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या भागातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहून एक मजबूत तालुका बनवण्यासाठी सर्वांनी पक्ष बांधिलकी राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मठाधीशानी सर्व मान्यवरांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार केला. चिकमुनोळी मठाच्या उन्नतीसाठी आतापर्यंत अनेकानी योगदान दिले आहे. असेच योगदान या मठाच्या उन्नतीसाठी राहावे या मठातर्गत अनेक भाविक नित्य दर्शनासाठी येतात त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी समाजसेवेचे योगदान महत्त्वाचे ठरते असे विचार स्वामीजींनी यावेळी व्यक्त केले
.

या कार्यक्रमात माजी तालुका पंचायत सदस्य श्रीकांत इटगी, सुनील मडीमणी, भारतीय जनता पार्टीच्या महिला राज्य सचिव धनश्री सरदेसाई माजी उपसभापती सुरेश देसाई, तालुका भाजपा प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप, भाजप नेते सुंदर कुलकर्णी, सुभाष गुळसट्टीसह अनेक जण उपस्थित होते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us