नंदगड प्रतिनिधी : भारतीय संस्कृती ही गौरवशाली परंपरा राखणारी आहे. अशा देशात अनेक शूर वीर योध्यांनी जन्म घेऊन ब्रिटिशांच्या जोखंडातून भारत देशाला मुक्त केले. कर्नाटकात संगोळी रायान्ना, वीरराणी कित्तूर चन्नामा सारख्या महायुद्धानीं ब्रिटिशा विरोध लढा दिला. अशा या गौरवशाली महायुद्धांचा उल्लेख संपूर्ण देशभरात आवर्जून केला जातो. भारतीय संस्कृती जपणाऱ्या या दक्षिण भारतातील कर्नाटकात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून या भागातील मतदारांनी दिलेला कौल हा स्वाभिमान वाढवणार आहे. कर्नाटकाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री येडुरप्पा यांनी दक्षिण भारतात भाजपची सत्ता आणली. व भाजपचे बळ वाढविले. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी कर्नाटकाच्या विकासासाठी अनेक योजना हाती घेऊन कामे मार्गस्थ लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कर्नाटकाच्या विकासासाठी विशेष लक्ष घातले असून कर्नाटकात औद्योगिक क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी अनेक योजना मार्गस्थ केल्या आहेत.बेळगाव हे कर्नाटकाचे मस्तक असून या भागाचा मान उंचावण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील मतदारांनी भाजपच्या पाठीशी कायम राहून पुन्हा एकदा कर्नाटकात भाजपचा झेंडा फडकवावा असे आवाहन त्यांनी केले.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण जगात भारत देशाची अर्थव्यवस्था गेल्या नऊ वर्षात उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारने केले आहे. भारत देशाची आर्थिक व्यवस्था सुधारत असताना कोविड काळात आलेली संकटे झेलण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. कोरोना लसीकरण मोफत करून जगात एक आदर्श निर्माण करून दिला. शेतकऱ्यांच्या हितावह अनेक योजना मार्गी लावून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत डबल इंजिन सरकारने अनेक योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनीही कर्नाटकाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्यातून अनेक योजना हाती घेतल्या जात आहेत त्यामुळे कर्नाटकात विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. कर्नाटकातील काही काँग्रेस नेते भूल थापा मारत जनतेला भरकटण्याचा प्रयत्न करत आहे अशांना जनतेने बळी पडू नये असे आवाहन करून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार यासाठी खानापुरातून भाजपच्या उमेदवाराला एक मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उत्तर कर्नाटकातील विजय संकल्प यात्रेचे अभियान ला आज नंदगड मधून प्रारंभ करण्यात आला. नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी स्थळाच्या जवळ असलेल्या मार्केटिंग सोसायटीच्या मैदानावर विजय संकल्प यात्रा अभियान कार्यक्रम पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते विजय संकल्प अभियानाच्या रथाची पूजा व भाजपचा ध्वज दाखवून त्यांनी अभियान प्रारंभ केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकातील मंत्री सी.सी पाटील, मुर्गेश निराणी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, भाजपा राज्याध्यक्ष नलिन कुमार कठील शिवाय अनेक मंत्री गण यासह बेळगाव जिल्ह्यातील अनेक आजी-माजी आमदार, खासदार, खानापूर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विजय संकल्प यात्रे संदर्भात अनेकानी विचार मांडले. राज्यसभा सदस्य खासदार ईराणा कडाडी, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, राज्याध्यक्ष नलीन कुमार कठील आदींनी विचार मांडले. शेवटी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी आभार मानले या विजय संकल्प यात्रेला जवळपास 20 हजार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.