खानापूर:
खानापूर तालुका हा निसर्ग संपन्न तसाच सप्तसुरानी नटलेला आहे. तालुक्यात उत्तुंग असे कलाकार आजही दडलेले आहेत. भजन, भजनी भारुड, नाट्य कलाकार, कुस्तीपटू, गायक, कीर्तनकार अशा दडलेल्या कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. अशा कलाकारासह प्रामुख्याने ग्रामीण भागात सुमधुर कंठाने सुरांची साथ देणाऱ्या गाणं कोकिळाही कमी नाहीत पण अशा सप्तसुराने गाणाऱ्या बाल व तरुण कलाकारांना प्रोत्साहित करून ऊर्जा देण्याचे काम झाले पाहिजे यासाठीच सुर संगम ग्रुपने आयोजित केलेला व्हॉइस ऑफ महालक्ष्मी ग्रुप 2023 कार्यक्रम प्रोत्साहित करणारा ठरेल असे उद्गार महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.रविवारी खानापुरात सूर्यसंगम ग्रुप प्रेझेंट “व्हाईस ऑफ महालक्ष्मी ग्रुप 2023” या स्पर्धांचा अंतिम कार्यक्रम झाला. या सांगता कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर संगम ग्रुपचे प्रमुख व खानापूरचे नगरसेवक आप्पया कोडोळी होते.
प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत सुरसंगम ग्रुपचे प्रमुख वसंत देसाई यांनी करून गायन स्पर्धांच्या आयोजनामागचा उद्देश मांडला. कार्यक्रमात महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हलगेकर यांनी दीप प्रज्वलन करून या अंतिम सोहळ्याला चालना दिली. यावेळी व्यासपीठावर सर्वोदया विद्यालयाचे फादर पिंटो, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर,डी. हंजी, भाजप कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी,पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, रॉबर्ट गोंसलविस यासह अनेक जण उपस्थित होते.
या स्पर्धा गेल्या सात फेब्रुवारी रोजी खुल्या गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्या होत्या. यामध्ये 42 स्पर्धकानी भाग घेतला होता. त्यामधून 15 स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली होती.
लोकोळीची काजल पाटील प्रथम
खानापूर येथील सर्वोदया विद्यालयाच्या पटांगणात आयोजित सुरसंगम ग्रुप प्रजेंट व्हॉईस