खानापूर (उदय कापोलकर.) खानापूर ते हेमडगा रस्त्याला जोडणाऱ्या शेडेगाळी क्रॉस वर नामफलक अनावरण कार्यक्रम पार पडला.येथील हिंदुस्तान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या नाम फलकाचे अनावरण केले आहे. शेडेगाली हे गाव या रस्त्यावर असून काही अंतरावर आहे. परंतु या ठिकाणी असलेला नामपलक बऱ्याच दिवसापासून मोडकळीत पडल्याने संबंधित ग्रामपंचायतीला अनेक वेळा विनंती करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर येथील युवा कार्यकर्त्यांनी तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने नाम फलक उभारून एक आदर्श निर्माण केला आहे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गावातून त्यांचे कौतुक होत आहे.