खानापूर : तालुक्यातील वरकड येथील श्री कलमेश्वर देवस्थानचा वार्षिक उत्सव सोहळा शनिवार दि. 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.18 रोजी सकाळी 7 वाजता श्री कलमेश्वर महापूजा सकाळी नऊ ते बारा पर्यंत संगीत भजन, सायंकाळी शिवपूजन आदी कार्यक्रम होणार आहे.रविवार दि. 19 रोजी सकाळी शिवलिंग अभिषेक व त्यानंतर सत्यनारायण पूजा दुपारी 2 वाजता महाप्रसाद होणार आहे.
या निमित्ताने रात्री 9 वाजता पाहुण्यांचा सत्कार व सवाल कार्यक्रम. रात्री 10 वाजता “बिजली कडाडली” हा नाटक प्रयोग होणार असून या नाट्यप्रयोगाला आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील,भाजप नेते विठ्ठल हलगेकर, निजद नेते नाशिर बागवान, पंडित ओगलेसह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या उत्सवाचा तसेच नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे