एम के हुबळी:(पिराजी कुऱ्हाडे) – कर्नाटकात गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारने अनेक विकासाभिमुख कामे राबवून जनतेच्या मनात एक घर केले आहे. पुन्हा एकदा याच विकासाची नांदी गोरगरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सर्वांनी उपस्थित रहावे. आज बेळगावातून होणारी ही विजय संकल्प यात्रा येणाऱ्या विधानसभेची नांदीच असेल, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे विचार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस व जेडीएस पक्षावर त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले, देशात परिवारवादी असलेल्या काँग्रेस व निधर्मी जनता दल सारख्या पक्षांचा समूळ नाश केला पाहिजे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा केवळ काँग्रेस प्रतिस्पर्धी नसून निधर्मी जनता दल देखील आहे. निधर्मी जनता दलाला दिलेला एक एक आमदार हा काँग्रेस पक्षाचाच गळ राहणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 18 आमदार जागा पैकी किमान 16 जागा जिंकण्याचे ध्येय राखले असून यासाठी बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी या विजय संकल्प यात्रेच्या माध्यमातून घर घर पोहोचून पक्ष संघटना मजबूत करावी असे आवाहन केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकास कामाचा डंका वाजत आहे. संपूर्ण जगताला आपलंस करून जगात पाचवा आर्थिक महासत्ताक देश बनवण्यासाठी केलेले प्रयत्न हे सर्व भाजपच्या तळागळातील जनतेच्या सहकाऱ्याचे फलित आहे. देशात विकासाभिमुख कामे राबवण्यात मोदीजी अग्रेसर राहिले आहेत, तीन करोड लोकांना घर, वीज. 10 करोड लोकांना शौचालय, 13 करोड लोकांना उज्वल गॅस योजना, 60 करोड लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मदतीचा हात उभा केला आहे. कोरोनाच्या महामारीकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तसेच कर्नाटकातील तात्काळीक मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा यांनी संपूर्ण देशाला मोफत वॅक्सिन डोज देऊन सर्वांना सुरक्षित बनवण्याचे काम केले आहे. एकूणच या देशभरातील विकास कामाबरोबर भारतावर दोन वेळा राष्ट्रपतीपदाचा मान मिळवताना केवळ आणि केवळ गरीब आणि आदिवासी असणाऱ्या समाजाला प्राधान्य देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे,
उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले, उत्तर कर्नाटकसाठी जीवन वाहिनी ठरणारा महादाई प्रकल्प हा लवकरच पूर्णत्वाला आणण्यासाठी क्रम हाती घेण्यात आले आहे, कर्नाटक आणि गोवा सरकारमध्ये असलेला वाद सामंजस्याने सोडवून येत्या काही दिवसात हा प्रकल्प पूर्णतः आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याशिवाय कितुर येथे एक हजार एकर मध्ये मेघा औद्योगिक कौन्सिल, लिफ्ट पाणी योजना यासह खानापूर तालुक्यात शंभर गावात पाचशे करोडची देगाव पाणी योजना सरकारने मंजूर करून या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आहे. या पुढच्या काळातही असाच विकास भाजपच्या डबल इंजिन सरकारने हाती घेण्यासाठी जनतेची साथ महत्त्वाची असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री बसवराज गोमाई माजी मुख्यमंत्री बी एस येडुरप्पा भाजप राज्याध्यक्ष नलित कुमार कठीण सह बेळगाव जिल्ह्यातील विद्यमान आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित होते या संख्येला हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते
खानापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने सहभाग
एम के हुबळी येथे झालेल्या विजय संकल्प यात्रेला खानापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी विशेष वाहनांची सोय केली होती. याशिवाय खानापूर तालुक्यातील भाजप अध्यक्ष पदाधिकारी तसेच विविध मोर्च्यांच्या पदाधिकाऱ्याने देखील या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग या विजय संकल्प यात्रेला केला होता. अशी माहिती भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर लाईव्ह शी बोलताना दिली.
तसेच केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिित राहिल्याबद्दल भाजपा अध्यक्ष संजय कुबल भाजप नेते विठ्ठल हलगेकर सह पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे