लोकोळी: गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या लोकोली जैनकोप महालक्ष्मी यात्रेला रविवारी तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वत्र चक्काजाम झाला होता.
बुधावर पासुन जल्लोषात सुरू झालेल्या यात्रेचा आज पाचवा दिवस तसेच मुख्य दिवस असल्याने यात्रेला एकच गर्दी झाली होती. सकाळपासुन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी सर्वत्र चका जाम झाल्यानें परगावाहून आलेल्या पाहुण्यांची बरीच गैरसोय झाली. गावात येणारी वाहणे चागलेश्वरी हायस्कूलकडेच पार्किंग करण्यात आल्याने पायी चालत यावे लागले. श्री महालक्ष्मी यात्रेला दुपारी बारापासून झालेली तुफान गर्दी लोकोळी गावच्या यात्रेतील आठवण देणारी राहणार आहे. लोकोळी गावाला जोडणारे खानापूर – परिस्वाड रस्त्यापासून मुख्य रस्ता पूर्णतः चक्काजाम झाल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. तर दुसऱ्या बाजूने लक्केबैल, यडोगा- चापगाव मार्गे देखील त्याच पद्धतीने वाहनांची गर्दी होती. त्यामुळे दिवसभर यात्रेकरूंना या गर्दीचा सामना करावा लागला.
रविवारी रात्रीही चक्काजाम
दिवसभर झालेली गर्दी ओसरता पुन्हा रविवारी सायंकाळी अधिक गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारच्या वेळी बाहेर गावच्या व लांब पल्ल्याच्या पायी पाहुण्यांनी दुपारी परतीचा प्रवास केला. पण सायंकाळी जवळपासच्या अनेक पै पाहुणे व भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत यात्रा परिसर तसेच गावात गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे रात्री बराच चक्काजाम झाला होता.चारचाकी वाहनांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली होती, मात्र दुचाकी वाहनांची रेलचेल अधिकच दिसून येत होती.त्यामध्ये जैनकोप गावाकडे जाण्यासाठी लोकोळी गावातून एकमेव रस्ता असल्याने त्याही रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे जैनकोप गावाला जाणाऱ्या यात्रेकरूंना याचा बराच त्रास सहन करावा लागला. एकूणच रविवारी दिवसभर व सायंकाळी झालेली गर्दी लोकोळी श्री महालक्ष्मी यात्रेच्या इतिहासातील एक आठवणीतला दिवस राहणार आहे. सदर यात्रा अजून तीन दिवस राहणार असून बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आगामी तीन दिवस यात्रेमध्ये गर्दी राहील अशी शक्यता आहे. यात्रेच्या ठिकाणी मनोरंजनाचे, खेळणीचे पाळणे व खेळणीची दुकाने यासह चांगली मांडणी या ठिकाणी करण्यात आली आहे. पण दिवसभर भाविकांची गर्दी त्यात धुळीचे साम्राज यामुळे भाविकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला.