लोकोळी (प्रतिनिधी)
तब्बल 23 वर्षानंतर मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या लोकोळी जैनकोप महालक्ष्मी यात्रोत्सवाला जवळपास 25 हजार हून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. बुधवारी सकाळी सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. त्यानंतर बुधवारी दुपारपर्यंत लोकोळी गावात जल्लोषी मिरवणूक झाली. नंतर जैनकोप येथे ओट्या भरणे व मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी महालक्ष्मी गदगेवर विराजमान होऊन यात्रा उत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महालक्ष्मी यात्रेची उत्तम मांडणी पंच कमिटीने हाती घेतली आहे.
बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर झालेल्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी खानापूर हल्याळ तसेच बेळगाव भागातील अनेक भक्तांनी पहाटे देवीच्या अक्षतारोपण सोहळ्याला उपस्थित दर्शवली होती. त्यामुळे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्वीच्या स्थळ देवस्थानच्या ठिकाणी एकच जनसमुदाय दिसून आला. हर हर महादेव व गुलाल भंडार्याच्या उदळणीमध्ये देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व युवावर्ग लहानथोराने मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता. अक्षतारोपण झालेल्या ठिकाणाहून देवी उठल्यानंतर जवळच असलेल्या 18 मंदिराना प्रदक्षिणा घालून देवीला गावात आणण्यात आले.व त्या ठिकाणीही जल्लोषी मिरवणूक झाली. या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी पुरोहित नरसिंह भडजी खानापूर यांनी पौराहित्य केले. प्रसंगी आमदार डॉ अंजली निंबाळकर, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.
सायंकाळी पाच वाजता होणार घरी वर विराजमान महालक्ष्मी देवीचा दिवसभर जल्लोषात मिरवणूक गावात सुरू आहे प्रथमतः लोकळी गावातील मानकरांच्या मोठ्या झाल्यानंतर जैन कोप गावातील मानकर यांच्या ओठ्या घेऊन सायंकाळी पाच वाजता देवी गदगेवर विराजमान होणार आहे त्यानंतर देवीसमोर बळ फिरवले जाणार आहे रात्री घरोघरी पै पाहुण्यांची मोठी गर्दी राहणार आहे उद्यापासून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या ठिकाणी उत्तम मंडप सजावट व दुकानांची गर्दी झाली आहे