खानापूर तालुक्यातील लोकोळी जैनकोप येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव येत्या 8 फेब्रुवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्ताने गावात जय्यत तयारी हाती घेण्यात आली असून ग्रामस्थ पंच कमिटीने 8 दिवसाचा उत्सवाचा आराखडा ही तयार केला आहे. लोकोळी -जैनकोप या गावची श्री महालक्ष्मी यात्रा तब्बल 22 वर्षानंतर साजरी होत आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येत्या 31 तारखेला अंकी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सात दिवसांनी म्हणजे दिनांक 08 फेब्रुवारी रोजी पहाटे 6.11 च्या सूर्योदयाच्या शुभमुहूर्तावर देवीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात होणार आहे. निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंच कमिटीने आठ दिवसाच्या यात्रेचा आराखडा तयार केला आहे. गावात रंग रांगोटी, मंदिरांची स्वच्छता, गावातील स्वच्छता अभियान, घराघरातील दुरुस्तीची कामे हाती घेऊन पै पाहुण्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.