लोकोळी: खानापूर तालुक्यातील लोकोळी-जैनकोप येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची तब्बल 23 वर्षांनी मोठी यात्रा उद्यापासून भरत आहे बुधवार दि 8 रोजी पहाटे6 वाजून 21 मिनिटांनी देवीचा अक्षता रोपण सोहळा होणार आहे. यानुसार गावात जयत तयारीला वेग आला असून विद्युत रचना ही सह मंडप सजावट कामात गाव मग्न झाला आहे. गेल्या 31 जानेवारी रोजी देवीचा अंकी घालण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर गेल्या पाच ते सहा दिवसापासून घरोघरी लाइटिंग व्यवस्था करणे पाहुण्यांना निमंत्रित करणे जोरदार तयारी सुरू आहे. पंच कमिटी गावातील धार्मिक विधी, लक्ष्मी देवीच्या यात्रेच्या ठिकाणी मंडप घालने व येणाऱ्या भाविकांच्या साठी गैरसोय होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे ही यात्रा मोठ्या गर्दीने होण्याची शक्यता आहे. याच्या तयारीला वेग आला आहे.
जुन्या गावाच्या ठिकाणी होणार देवीच्या अक्षतारोपण
लोकोळी – जैनकोप ही दोन गावे सध्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेली गावे आहेत. या या दोन्ही गावांचे मूळ ठिकाण हे जुन्या स्थळ देवताच्या ठिकाणी होते, असे लोक