खानापूर : तालुक्यातील प्रसिद्ध लोंढा श्री सद्गुरु शांडिल्य महाराज मठामध्ये वार्षिक उत्सव कार्यक्रम दि. 13 फेब्रु. 14 फेब्रु. 15फेब्रु. रोजी श्री शांडिल्य महाराज मठ, लोंडा येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने सोमवार दि. 13 रोजी सकाळी 9 वाजता अभिषेक व दुपारी12 वाजता तिर्यप्रसाद, दु. 1 वाजता श्रींच्या पालखीची गावातुन मिरवणुक पालखी सोहळा होणार आहे. या मिरवणुकीमध्ये लोंढा, मांजरपपै, सातनाळी मांचाळी, पिंपळे, मुंडवाड, पाली, सितावाडा, रामनगर, आडाळी, अस्तोली, आक्राळी, कुराडवाडा राजवळ, दुधवाळ, मिराशी वाटरे, घोसे , भाऊचा भजनी मंडळांचा यामध्ये सहभाग राहणार आहे
मंगळवार दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 ते 12 अभिषेक, त्यानंतर सत्यनारायण महापुजा
व नंतर आरती, इत्यादी दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसाद .दु. 3 वाजता श्री दत्त भजनी मंडळ, रामनगर यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता श्री व्याघ्रेश्वर भजन मंडळ लोंढा यांचा कार्यक्रम तर
रात्री 8 वाजता हनुमान भजनी मंडळ, हडलगा यांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. 15 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अभिषेक, आरती, प्रसाद व
खळ्यांच्या जंगी कुस्त्या
बुधवार दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता खळ्यांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पैलवान बंधू व कुस्ती शौकिनानी लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
दिलेले दान सौभाग्याचे नाटक प्रयोग
या उत्सवाच्या निमित्ताने 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता रामनगर येथील श्री राम नाट्य मंडळ दिग्दर्शित कौटुंबिक नाटक दिधले दान सौभाग्याचे हा प्रयोग होणार आहे याचाही भाविकांनी लाभ घ्यावा असे उत्सव कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.