खानापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून तलाठी पासून उपतहसीलदार पदापर्यंत सेवा केलेले राजेश चव्हाण यांची अखेर जोयडा येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
जोयडा येथे तहसीलदार पदाची जागा बरेच दिवस रिक्त होती.या पदावर तात्पुरती तहसीलदार पदाची नियुक्ती करण्यात येत होती. यामुळे कायमस्वरूपी तहसीलदारची नियुक्ती व्हावी यासाठी कायम मागणी होत होती. आता जोयडा येथे कायमस्वरूपी म्हणून राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश चव्हाण हे खानापूर तालुक्यात परिचित असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते मूळतः खानापूर तालुक्यातील लोंडा गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा महसूल खात्यातील अनुभव लक्षात घेता खानापूर येथे त्यांनी तहसीलदार पदासाठी गेल्या काही महिन्यापासून इच्छुक होते. पण सध्या परिस्थितीत निवडणुका जवळ आल्याने त्यांची जोयडा तहसीलदार कार्यालयात ग्रेड -2 तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे