गोधोळी:
भारतीय संस्कृतीत खेळांना अधिक महत्त्व आहे. कुस्ती, कबड्डी सारखे परंपरागत आलेल्या खेळांना महत्व आहे. त्याच पद्धतीने अलीकडच्या युवा वर्गात प्रसिद्ध असलेला क्रिकेट खेळ हा आवडीचा बनला आहे. खेळांचे आयोजन करून परिसरातील शेकडो युवा वर्गांना खेळाचे महत्व व एकीचा संदेश देण्याचे काम असे खेळ करतात. गोधोळी गावात युवकांनी एकत्रित येऊन एका कार्यक्रमाच्या निमित्ताने असा हा सांघिक खेळ भरून एक दिशा देण्याचे कार्य केले आहे. एकी आणि ध्येयनिष्टता या महत्त्वाच्या बाबी असून खेळाकडे वळलेल्या युवकांना आरोग्य संपदे बरोबर रोजगाराची ही गरज आहे. यासाठी खानापूर तालुक्यात आगामी काळात उत्तम व्यासपीठ व रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्नांची कास धरणे गरजेचे आहे. यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नेते विठ्ठल हलगेकर सारखे नेतृत्व खानापूर तालुक्याला अपेक्षित आहे. 2018 च्या निवडणुकीत निसटता पराभव भरून काढण्यासाठी अमिषाला बळी न पडता भाजपा च्या पाठीशी सर्वांनी राहावे. असे आवाहन केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आतापर्यंत हलगेकर सरांच्या ध्येय व दूरदृष्टीकोनातून तालुक्यात अनेकांना रोजगार निर्मितीचे केंद्र सुरू करणे व तालुक्याच्या विकासाबरोबर नवनवीन औद्योगिक योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सरांचे कार्य पाहता भारतीय जनता पार्टी नक्कीच सरांना उमेदवारी देणार यात शंका नाही, यासाठी आपण सर्वांनी हलगेकर सरांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन लैला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी व्यक्त केले.
शनिवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गोधोळी ता. खानापूर येथे आयोजित ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक व भाजप प्रयत्न मोर्चाचे प्रमुख मनोहर कदम होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्ते राजू रपाटी, मारुती हरिजन, शिवानंद गोधोळी, यल्लाप्पा चन्नापूर,नागराज गौडपबोर, रुद्रप्पा बोभाटे यासह अनेक जण उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप पूजा झाल्यानंतर सदानंद पाटील यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये जवळपास 40 संघानी भाग घेतला असून पुढील दोन-तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजनासाठी भाजप नेते विठ्ठल हलगेकर तसेच सदानंद पाटील सह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक भाजपचे कार्यकर्ते विविध स्तरातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.