पिराजी कुऱ्हाडे (प्रतिनिधी)
खानापूर तालुक्यातील लोकोळी- जैनकोप गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा येत्या 8 फेब्रुवारी पासून नऊ दिवस उत्साहात साजरी केली जाणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचा साखरपुडा अर्थात अंकी घालण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तब्बल 23 वर्षांनी होणाऱ्या या महालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी गावात सुरू असून मंगळवारपासून गावात धार्मिक विधीना उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने सकाळी गावातील सर्व दैव देवतांना अभिषेक व महापूजा झाल्यानंतर ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या मंदिरासमोर देवीचा रेडा फिरवून त्या ठिकाणी देवीचा साखरपुडा करण्यात आला. खरंतर महालक्ष्मी यात्रा अगोदर सात दिवस होणारा हा कार्यक्रम त्याला अंकी घालण्याचा कार्यक्रम म्हटला जातोय, तर दुसऱ्या अर्थात त्याला ईरडी घालणं कार्यक्रम ही म्हटले जाते. याचा तसा खरा अर्थ हा देवीच्या लग्नाचा साखरपुडा म्हटले तर वावगं ठरणार नाही. या अनुषंगाने लोकोळी गावात सकाळी गावात क** वार गावातील लोक मंदिरासमोर जमा झाले होते.
लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर एका कांबळय़ावर घटाची पूजा केली जाते. रितिरीवाज, मान, परंपराप्रमाणे प्रत्येक घराण्याच्यावतीने ओट्या भरुन झाल्यानंतर देवीच्यासमोर विधीवत पूजन केले जाते. देवीच्या नावे पाच जिनसाचे धान्य टोपलीत रोव घालणेची परंपरा आहे. रोव घालणे म्हणजे घटस्थापना करणे त्यालाच इरडी भरणेचा कार्यक्रम म्हटला जातो.
यावेळी विधीवत पुजेसाठी लागणारे साहित्य तसेच देवीच्या नावे असलेले सर्व मनी मंगळसूत्र, साडीचोळीचे सर्व साहित्य मंदिरासमोर आरास केले जाते. इरडी भरल्यानंतर सुहासिनी देवासमोर दिवा पेटवून आरती ओवाळणी केली जाते. तत्पूर्वी गावच्यावती वतीने वतनदाराकडून गाऱ्हाणं घातला जातो. त्यानंतर मातंगीच्या नावे पूजा केली जाते. हा संपूर्ण विधी झाल्यानंतर त्या ठिकाणी देवीचा साखरपुडा पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी उपस्थित सर्व लोकांना गुळ साखर वाटली जाते. त्यानंतर रितिरीवाजाप्रमाणे पंच कमिटीकडून साखरपुडा झाल्याचे आव्हान केल्यानंतर सर्वजन हा प्रसाद घेतात. त्यानंतर पुढील सात दिवस टेपलेली महालक्ष्मी यात्रा सजावट व तयारीला ग्रामस्थ जोमाने लागतात. अशी परंपरा या देवीच्या उत्सवात करण्याचे रितिरीवाज आहे. या पद्धतीने येथील पंच कमिटी व ग्रामस्थांनी मंगळवारी हा साखरपुड्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सेक्रेटरी खजिनदार यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते