खानापुर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, सदस्य मर्याप्पा पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, वासुदेव चौगुले, प्रा. शंकर गावडा, वैभव चोरलेकर, योगेश गावडे, शुभम बैलुरकर,उदय कापोलकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.