खानापूर : प्रतिनिधी-
सीमा भागात मराठी भाषेची एकीकडे गोची होत असताना मराठी भाषा जोडण्याचे व जगण्याचे काम प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान गेल्या बारा वर्षांपासून हाती घेतले आहे. आज बारा वर्षाची तपपूर्ती करत असताना आणीबाणीच्या काळातही मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने हाती घेतलेले काम हे उल्लेखनीय आहे. या संस्थेला कोणताही गॉड फादर नाही, पदरमोड करून प्रसंगी कर्ज काढून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करून प्रेरणा देण्याचे काम या प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. मातृ भाषेला जगण्यासाठी हाती घेतलेली ही चळवळ अशीच कायम ठेवून यांच्या पाठीशी मराठी भाषिकांनी राहिल्यास मराठी भाषेला पुढच्या काळात चांगले दिवस येतील, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने खानापूर तालुक्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यासाठी झटण्याचे काम केले आहे. अनेक जण भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत असले तरी प्रतिष्ठान ने ते जोडण्याचे काम केले आहे. याचे उदाहरण कात्री आणि सुई मधला फरक देऊन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितला, अशा या मराठी संस्कृती जतन करण्याच्या संस्थेच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपले गुणात्मक व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांनी दवाखावे असे आवाहन प्राध्यापक अरविंद पाटील यांनी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते. कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर, माजी ता.प सदस्य पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील माजी ता.प सदस्य बाळासाहेब शेलार, समिती नेते आबासाहेब दळवी, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, समिती नेते प्रकाश चव्हाण, डी.एम. गुरव, गोपाळ पाटील, पि.के चापगावकर, अर्जुन देसाई, प्रा.आय. एम. गुरव, निरंजन सरदेसाई, आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नारायण कापोलकर म्हणाले ,गेल्या बारा वर्षात अनेक प्रसंगांना तोंड देत ही संस्था कार्य करत आली आहे.मराठी भाषा जगवण्यासाठी अनेक पाईकांना एकत्रित करून काम हाती घेतले आहे. खानापूर तालुक्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यांचे बळ वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेला मिळालेला हा प्रतिसाद उल्लेखनी असला तरी पुढच्या रविवारी होणाऱ्या सामान्य ज्ञान स्पर्धेला 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचाही लाभ खानापूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी करून नजीकच्या काळात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचनालय सुरू करून विद्यार्थ्यांना व शालेय मुलांना स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रविवारी झालेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेला अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात अनेकांनी मराठी सांस्कृतिक प्रतिसाद च्या कार्याबद्दल गौरव करणारी भाषणे केली. कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रल्हाद मादार यांनी तर आभार प्रा शंकर गावडा यांनी मांडले