खानापूर : बेळगाव ते धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. पहिल्या टप्यात कित्तूर भागातील क्यारकोप ते मुमिगट्टी या ११.७ किलोमीटर लाबांच्या भागांचे काम हाती घेतले जाणार आहे. या मार्गांचे विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
बेळगाव ते धारवाड रेल्वेमार्गासाठी २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारने २० कोटी रुपयांची तरतूद केली होती, तर २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर राज्य सरकारने या मार्गासाठी ४२३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमार्गाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. सध्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध पण…..
रविवारी (ता. १९) गर्लगंजी शिवारात सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकन्यांनी पिटाळून लावून लावले होते. पण, आता ऑगस्टपासून थेट काम सुरू केले जाणार असल्याने शेतकन्यांची अडचण झाली आहे. येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याची योजना आहे. त्यामुळे वेगाने काम हाती घेतले.सध्या धारवाड, जाण्यासाठी लोंडयावरून जावे लागते. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. नवीन रेल्वेमार्गामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. मात्र, या रेल्वेमार्गामुळे मोठे नुकसान होणार असल्याने काही शेतकन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबतची याचिका प्रलंबित आहे. तरीही वेगाने काम हाती घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेतकन्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता आहे. येत्या चार दिवसांत हुबळीला बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, रेल्वेमार्गविरोधी आंदोलन कितपत यशस्वी होणार याकडे लक्ष लागले आहे
कित्तूर भागातून विरोधच नाही?
देसूर, गर्लगुंजी आदी भागांतील शेती सुपीक असल्याने रेल्वेमार्गाला विरोध होत आहे. शेती वाचविण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, कित्तूर आणि इतर भागांतील शेतकरी रेल्वेमार्गाला विरोध करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात धारवाड ते कित्तूरपर्यंतचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याचा फटका विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Rsps sipra pvt Ltd ह्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना preliminary survey साठी garlgunji येथील शिवारातून शेतकऱ्यांनी वापस पाठविले, शेतकऱ्यांचा बेळगाव धारवाड होणाऱ्या नवीन रेल्वेमार्ग ला देसुर ते केके कोप पर्यंत च्या मार्गाला सुपीक जमिनीतून जात असल्यामुळे विरोध आहे, kiadb धारवाड तसेच General manager SWR यांच्याकडे शेतकऱ्यांनी आक्षेप पण नोंदविला आहे आणि हा प्रश्न हायकोर्ट dharwad येथे प्रलंबित आहे तरी रेल्वे विभाग अरेरावी करत शेतकऱ्यांच्या शेतात survey करत आहेत याला जशास तसे उत्तर गर्लगुंजी येथील शेतकऱ्यांनी दिलेले आहे, ग्राम पंचायत s प्रसाद पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला पण अधिकाऱ्यांना कोणतीही उत्तर देता आली नाहीत, शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय शेतात पाय ठेवाल तर याद राखा असा सज्जड दम प्रसाद पाटील आणि शेतकऱ्यांनी अधिकारी आणि सर्वे कामगारांना दिला..शेतकऱ्यांनी नापीक जमिनीतून पर्यायी मार्ग स्वखरचाने सर्वे करून दिलेला होता ज्यामुळे सुपीक जमिनी वाचतील रेल्वे अंतर कमी होईल आणि प्रोजेक्ट चे कोट्यानी पैसे ही वाचतील ..पण लोकप्रतिनिधींच्या हेकेखोर पणामुळे जुनाच मार्ग रेल्वे विभाग निवडत आहे..
खासदारांचा मोठा स्वार्थ
के.के कोप, कित्तूरमार्गे असलेल्या रस्त्यामध्ये बेळगावच्या विद्यमान कास्तारांचा स्वार्थ असल्याचा आरोप या या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.असे जर असेल तर येत्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना गावात प्रचारा साठी प्रवेश ही देणार नाही त्यांना जशास तसे उत्तर शेतकरी देईल अशी प्रतिक्रिया नंदीहळी कृषी पतीचे संचालक राजेंद्र पाटील, डॉ. किरण लोंढे यशवंत पाटील, नामदेव कुंभार, अरुण सावंत, प्रकाश सिधानी, संजय सिधानी, कलापा लोहार, संगाप्पा कुंभार , सदानंद पाटील ,नामदेव कुंभार, मारुती राऊत परशराम जाधव आदींनी दिले आहे