खानापुरात भाजप पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद,
खानापूर : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी उद्या सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने बेळगावात त्यांची भव्य सभा व रोड शो होणार आहे. या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील जवळपास 25 हजार भाजप कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल सह पदाधिकाऱ्यांनी शनिवारी घेतलेले एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.
यावेळी ते म्हणाले,सोमवार दि 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव येथील नवीन बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रम तसेच त्यांचा बेळगावतून रोड शो होणार आहे. त्याचप्रमाणे येथील मालिनी सिटी पटांगणावर सभा आयोजित केलेली असून सदर सभेला खानापुरातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित दर्शवण्यासाठी खानापूर तालुका मंडळ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. प्रत्येक ग्रामपंचायत निहाय कार्यकर्त्यांना या सभेला जाण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथ प्रमुख व विभागीय त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार आढावा बैठकीनंतर खानापूर तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत कार्यक्रमाविषयी माहिती दिली,
प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत भाजपा नेते किरण यळूरकर यांनी केले, यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले,
आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येथील मालिनी सिटी पटांगणावर भव्य सभेमध्ये जनतेला संबोधित करणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातून तीस ते चाळीस हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने खानापूर तालुक्यातून जवळपास 25 हजार भाजप कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नागरिकांना या सभेला उपस्थिती दर्शवण्यासाठी संघटनात्मक काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
02 मार्च रोजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग खानापुरात
त्याचप्रमाणे येत्या दोन मार्च रोजी सकाळी 10 वाजता नंदगड येथे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंगजी यांची सभा होणार आहे. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी ही सभा देखील यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशा सूचना ही भाजप कार्यकर्त्यांना या बैठकीत मांडल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये उद्या दि. 27 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व दोन तारखेच्या सभेला ही तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहून दौरा यशस्वी करावा असे आवाहन यावेळी केले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जोतिबा रेमानी राज्य महिला कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई तालुका पंचायतच्या माजी सदस्या वासंती बडीगेर, भाजपा तालुका जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी,भाजप नेते व भू विकास बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, भाजपा मीडिया प्रमुख राजेंद्र रायका आदिजन उपस्थित होते