खानापूर प्रतिनिधी: कर्नाटक राज्य शिवसेनेचे उपाध्यक्ष, व श्री साई कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान के. पी. पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बरगाव श्रीमान के पी पाटील नगर येथे शुक्रवारी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांक च्या कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांनी पंजाबच्या पै. कमळजीत याच्यावर लाटणी डावावर विजय मिळविला. दोघांच्यात 15 मिनिटे खडाजंग कुस्ती झाली. सदर कुस्ती श्रीमान के. पी. पाटील मा. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील. डी.एम भोसले, अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष हनुमंत गुरव माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळी आदींच्या हस्ते लावण्यात आली. तर द्वितीय क्रमांकाची कुस्तीत कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार यांनी पंजाबच्या राकेश कुमार वर विजय मिळवला.तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कारवेचा कीर्ती कुमार यांनी गंगावेश कोल्हापूर येथील पै. कालीचरण सोलंनकर यांच्यावर मात केली तर पै. पंकज चापगाव,पवन चिकदीकोप याने धारवाड होस्टेलच्या आदित्य बिडीहाळ याच्यावर विजय संपादन केला. आखाड्यात पैलवान पार्थ कंग्राळी विरुद्ध पैलवान कृष्णा यमुनापूर यांच्यात तडफदार कुस्ती झाली मात्र ती बरोबरीत सोडवण्यात आली.त्याचप्रमाणे कुस्ती आखाड्यात पैलवान विजय बुचकुळे, विनायक बेकवाड चा अनेक पैलवान कुस्त्या जिंकल्या. कुस्ती आखाड्याचे उद्घाटन परमपूज्य गोपाळ महाराज हलवा यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी श्रीमान के पी पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा या कुस्ती मैदानात भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती यशस्वी करण्यासाठी कुस्तीगीर संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच त्यांच्या हितचिंतकांनी मोठे सहकार्य केले.
कुस्ती आखाड्याचे समालोचन प्रसिद्ध समीक्षक कृष्णा चौगुले राशिवडे व अर्जुन देसाई हालशीवाडी यांनी केले.