बेळगांव: आज सर्वत्र होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या होलिकोत्सवाच्या रंगात बेरंग झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी नजीक घडली आहे. रंगपंचमी खेळल्यानंतर आपल्या मित्रासमवेत रंगोत्सवाचा आनंद घेऊन खादरवाडी जवळच्या धरणात आंघोळीसाठी गेलेल्या अविनाश देवलेकर राहणार सिद्धेश्वर गल्ली, पिरणवाडी (वय 22) वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घडली आहे. सकाळपासून रंगपंचमी खेळून मित्रा समवेत अंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंत न लागल्याने तो बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिसात झाली रंगपंचमी दिवशी झालेल्या या घटनेमुळे पिरनवाडी परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.