IMG-20230218-WA0005

निलावडा: तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक -दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू चिकूची झाडे तसेच गवतगंजी सह शेतीचे बरेचसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

आगीच्या दुर्घटनेत येथील नारायण दळवी, दिनकर देसाई, कृष्णा देसाई, संभाजी देसाई, पुंडलिक उचगावकर, हनुमंत उसगावकर, बाबुराव गुरव या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक लागल्याने जवळपास दोन ते तीन ट्रॅक्टर गवत गंजी जळून खाक झाली. या आगीच्या भडक्यामुळे जवळच असलेल्या ऊस पिकात आग शिरली व ऊसही जळून खाक झाला.यामध्ये असलेले शेती पाईप व इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पण तोवर प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आग विझवली वेळीच आग आटोक्यात आले नसती तर अनर्थ घडला असता.

या चार दिवसात खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आगीची ठिणगी पडून नुकसान झाले आहे. रेल्वेचे काम सुरू असताना लोंढा जवळ आग ठीनगी पडून चार एकर जंगल जळून खाक झाले. शिवाय इदलहोंड येथे झोपडपट्टीला आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या.हो णकल येथेही काजूची बाग जळून नुकसान झाले.अशा अनेक ठिकाणी लहानसहान आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्कता राखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us