खानापूर ; खानापूर तालुका आर्मी ,नेव्ही व एअर फोर्स माजी सैनिक संघटनेच्या वतीने 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खानापूर जांबोटी क्रॉस येथील कार्यालयाच्याआवारात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निरंजन सरदेसाई तसेच राजू कं कंग्राळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला. त्यानंतर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी कॅप्टन पांडुरंग मेलगे होते. कार्यक्रमाला कार्यक्रमाला बेळगाव येथील संजय भाकोजी, उमेश चौगले व परशराम चापगावंकर सह संघटनेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी धाकलु हेब्बाळकर यांनी केले. कार्याध्यक्ष गोपाळ देसाई यांनीही प्रजासताक दिनांच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले उपस्थीतीच्या सर्वांना आपल्या व परिवांराच्या वतीने शुभेच्छा दिल्या. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मेलगे यांनी देशासाठी स्वातंत्र मिळाल्या संदर्भात देशाच्या सैनिकांचे योगदानाच्या संदर्भात विचार मांडले व सर्वानाच आजी माजी सैनिकांना तसेच आलेल्या पाहुण्याना 26 जानेवारीच्या आवसर हार्दिक शुभेच्छा दिल्या इतर प्रमुख पाहुणे…
यावेळी बोलताना निरंजन सरदेसाई म्हणाले, देशासाठी झटणाऱ्या आजी – माजी सैनिकांचे त्याग मौलाचे ठरते. सेवेत कार्य करत असताना घर परिवाराला मागे ठेवून जीवाशी लढण्याचे धाडस सैनिक करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सैनिक हे देशाचा मुख्य कणा आहे यासाठी त्यांचा आदर राखला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी कंग्राळकर तसेच संजय भागोजी यांनीही संघटनेच्या कार्याबद्दल विचार मांडले विचार व्यक्त केले. त्यानंतर संघटनेच्या वतीने आलेल्या पाहुण्याचा शाल व श्रीफळ देऊन आध्यक्षाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यावेळी नुकताच रिटायर झालेले हवालदार परशराम पाटील खानापूर त्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सुभेदार नारायण झुंजवाडकर यांनी सर्वांचे आभार मांडले यावेळी खानापूर तालुक्यातील अनेक आजी-मजी सैनिक व त्यांचा परिवार उपस्थित होता