बेळगाव रोटरी ई क्लब बेळगाव यांच्यावतीने 28 जानेवारी रोजी बेळगाव येथील जीएसएस कॉलेजमध्ये व्यावसायिक सेवा पुरस्कार सोहळा वितरित करण्यात आला या सोहळ्यात फुलेवाडी येथील दिव्यांग कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार यांना हा व्यवसायिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोटरी ई क्लब बेळगाव यांच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कार्य कुशलतेचे व उद्यमशीलतेचे कार्य लक्षात घेता अशा व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केला जातो. त्याचप्रमाणे पुंडलिक कुंभार तसेच असोसिएशन ऑफ फिजिकल हॅंडीकॅपचे गिरीश सव्वाशेरी यांना हा व्यवसायिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रमोद हनमगौड होते यावेळी आशुतोष डेव्हिड यांनी व्यावसायिक सेवा पुरस्कारासंदर्भात माहिती दिली. अनंत नाडगौडा यांनी पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. रोट्रॅक्ट युजेनिया रॉड्रिक्स यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सागर वाघमारे यांनी आभार मानले. पुंडलिक कुंभार तसेच सव्वाशेरी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे