खानापुरात संगणक वितरण कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस सुधारक चालली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतीत सुधारित शिक्षण आणण्याचा विचार केंद्र शासनाने अमलात आणला आहे.लवकरच याची अंमलबजावणी होणार यात शंका नाही. अलीकडच्या काळात यापूर्वीच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीचे धडे देणारे संगणकीय ज्ञान नसल्याने अनेक शाळातील विद्यार्थी यापासून वंचित आहेत. यासाठी खानापूर तालुक्यात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या आपल्या स्थानिक आमदार फंडातून 35 अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रमाणे संगणक मंजूर केले आहेत. याचा संबंधित शाळातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित व्हावे असे आवाहन विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी यांनी व्यक्त केले.खानापूर येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित संगणक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थिताचे स्वागत शाळा कमिटीचे अध्यक्ष अधीवक्ते चेतन मनेरिकर यांनी केले. यावेळी खानापूर तालुक्यात हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल खानापूर तालुका भाजपा तसेच स्वामी विवेकानंद शाळेच्या वतीने विधानपरिषद सदस्य निराणी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील,युवा नेते पंडित ओगले, बाबुराव देसाई, भाजपा प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, भाजपाचे सचेतक किरण येळूरकर, नगरसेवक अपया कोडोली,शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य जयंत तीनईकर, सदानंद कपलेश्वरी यासह खानापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित होते