बेळगाव : बेळगाव तालुक्यात पिरणवाडी नजीक एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच दुसरीकडे मच्छे जवळ शेतवाडीत एका तरुणाचा जांभीयाने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली अधिक माहिती अशी की, मजगाव लक्ष्मी गल्लीतील
युवक प्रतीक एकनाथ लोहार (वय23) या युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिर शेजारी शेतवाडीमध्ये
आणले व त्यानंतर त्याचा चाकू व जांबीयाने भोसकून
खून केला. सदर आरोपीने खून करून मजगाव गावात येऊन बिनधास्त फिरत असताना प्रतीक लोहार याचा खून झाल्याची घटना कळताच त्याचा पाठलाग करून त्याच्या वाहनाची मोडतोड केली. पण त्या संशयित आरोपीने तिथून पलायन केल्याचे समजते. याबाबत सदर युवकावर बेळगाव वडगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांचा तपास करीत आहेत. संशयित आरोपीवर उद्यम बाग पोलीस स्थानकात विविध स्वरूपाचे गुन्हेही असल्याचे कळते.