खानापूर:
खानापूर कर्नाटकात भारतीय जनता पार्टी सरकारने अनेक विकासामुळे कामे राबवली आहेत. गेल्या पाच वर्षात राबवलेली विकास कामे ही पुढील पाच वर्षात कार्यान्वित करण्यासाठी पुन्हा एकदा कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार येणे आवश्यक आहे.व राज्य शासनाने अमलात आणलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून जनजागृती करणे आवश्यक आहे. कर्नाटकात यावेळी मागील पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पार्टी जिंकणार यात शंकाच नाही. मंड्या सारख्या जिल्ह्यामध्ये देखील भाजप अधिकाधिक जागा मिळवणार यात शंका नाही. त्यामुळे कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार निवडून येणार असे विचार भाजपा राज्य उपाध्यक्ष निर्मल कुमार खुराणा यांनी व्यक्त केले
विधानसभेची निवडणूक म्हणजे इच्छुकांची परीक्षाच:
यावेळी खानापूर तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा सूराणा यांनी येथील विश्रामधामात कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर शिवस्मारकात कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, खानापूर तालुक्यात मागील निवडणुकीत थोड्याच मतांनी पराभव झाला आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी एकसंघ राहून काम करणे गरजेचे आहे, खानापुर विधानसभा क्षेत्रात भाजपातून तालुक्यात अनेक जण इच्छुक आहेत. पण इच्छुकांनी पक्षाच्या झेंड्यावर काम करताना मंडळ पदाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्याचा वापर करू नये, ज्या पक्षात अनेक जण इच्छुक, त्या पक्षाचा विजय निश्चित असतो. करिता पक्ष कोणाला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी एक संघ राहून खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा आमदार करा, असे सूचित वाक्य भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सूराना यांनी सोमवारी खानापुर शिवस्मारकात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते.
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत तालुका प्रधान कारदर्शी बसवराज सानिकोप यांनी केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सूराना यांचे तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी स्वागत केले. त्यानंतर राज्य महिला सेक्रेटरी उज्वला बडवानाचे यांनी उपस्थित बुथ प्रमुख कार्यकर्त्यांना पक्ष संघटना व प्रत्येक बूथनिहाय बांधणी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनीही पक्ष संघटना व भूतनिहाय कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी मांडली. यावेळी भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,माजी आमदार अरविंद पाटील, धनश्री सरदेसाई, बाबुराव देसाई, ज्योतिबा रेमानी,सुरेश देसाई, सोनाली सरनोबत, गुंडू तोपिनकट्टी.सह भाजपचे पदाधिकारी बुथ कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते