सौंदत्ती : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती जवळ असलेल्या करिकटी येथे राहत्या घराचे छत अंगावर कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून वृद्ध महिला मृत्युमुखी पावल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव शांतव्वा शिवमुर्तया हिरेमठ वय 60 राहणार करिकट्टी (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) असे आहे सकाळी ७.३० वा. सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची नोंद सौंदत्ती पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.