चापगाव /प्रतिनिधी- चापगाव येथील जागृत देवस्थान श्री फोंडेश्वर देवाची वार्षिक यात्रा आज शनिवार दि 4 फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे या यात्रोत्सवाची सांगता रविवार दि पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजता पालखी सोहळ्याने होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि चार रोजी सायंकाळी सात वाजता श्री देवाचा पालखी सोहळा निघणार आहे. त्यानंतर श्री फोंडेश्वर मंदिर जवळ रात्री नऊ वाजता सत्कार व स्वागत समारंभ होईल त्यानंतर रात्री बारा वाजता इंगळयांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि 5 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत श्री मंदिरासमोर नवस फेड आधी कार्यक्रम होणार आहे त्यानंतर परतीचा पालखी सोहळा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे तरी भाविकांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री फोंडेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
मंदिरासमोर भव्य पथदीप व विद्युत रोषणाई
श्री फोडेश्वर मंदिराचा दोन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला असून या मंदिराची अजून बरीच कामे प्रगतीपथावर आहेत या मंदिरासमोरील पटांगणात दोन लाख 70 हजार रुपये खर्च करून भव्य असा पथदीप उभारण्यात आला आहे सदर पद्धती कौंदल येथील मारुती पाटील उद्योजक पुणे यांनी स्वखर्चाने बसून दिला आहे तसेच यावर्षी मंदिरासमोर पूर्ण विद्युत रोषणाई व्यवस्था चा भाव येतील ट्रॅक्टर मालक अरुण कृष्णा धबाले यांनी जवळपास पंधरा हजार रुपये खर्च करून मंदिराला मदत केली आहे या दोन्ही देणगीदारांचा यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे त्यांनी मंदिरासाठी केलेल्या या सहकार्याबद्दल त्यांचे ग्रामस्थ व देवस्थान कमिटीच्या वतीने अभिनंदन होत आहे