चापगाव :चापगाव तालुका खानापूर येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गवत गंजीला आग लागून एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील मारुती मशनू कदम यांच्या शेतीवाडीतील घराच्या बाजूला असलेल्या गवत गंजीला दुपारी पावणे पाचच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने त्यांचे दोन ट्रॅक्टर गवत जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशी लागली हे कळले नाही, मात्र यामुळे गवतगंजीसह आजूबाजूला असलेल्या काजू पिकाचेही नुकसान झाले आहे. आगीचा भडका उडताच जवळपासच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही. गवतगंजी ही जळून खाक झाली. बाजूला असलेल्या गवत गंजीला आग लागू नये यासाठी सतर्कता राखण्यात आली. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.