खानापूर : भाजप सरकारच्या केंद्र व राज्यसरकारच्या वतीने अमृत जल योजनेंतर्गत खानापूर शहरासाठी २० कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर झाला असुन आता खानापूर शहरातील पाण्याची समस्या भाजप सरकारने मार्गी लावली अशी माहिती गुरुवारी दि २ रोजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्राम धामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भाजप भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली. या पत्रकार परिषदेला खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजप नेते विठ्ठल आलगेकर माजी आमदार अरविंद पाटील प कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, संजय कची, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्याच्या आमदार भाजप सरकारकडून कोणताच निधी मिळत नाही. अशी कायमच तक्रार करत असतात.भाजप सरकारने अनेक सवलती सर्वसामान्य नागरिकांना दिल्या आहेत.
केंद्र व राज्य सरकारने देशाात शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहेत यापैकीी केंद्र व राज्य सरकारच्याा संयुक्त आश्रयाखाली राबविण्यात येणारी अमृत जल योजना कर्नाटकात एकोणीस शहरांना लागू करण्यात आली आहे त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर खानापूर शहरा करता अमृत योजनेसाठी केंद्र १९ कोटी ३७ लाख रूपये निधी तर राज्य सरकारकडून १ कोटी १५ लाख रुपये निधी असा २० कोटी ५२ लाख रुपये निधी मंजूर करून लवकरच खानापूर शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे या संदर्भात शहरी पाणीपुरवठा विभागाच्या सचिव एन मंगलगौरी यांनी 30 जानेवारी रोजी काढलेल्या आदेश पत्रा द्वारे केले असल्याची माहिती माजी आमदार अरविंद पाटील यांनी यावेळी दिले यावेळी बोलताना भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्याया अनेक योजना मंजूर असून त्या अंतिम उंबरठ्यावर आहेत त्यापैकीी केंद्र केंद्र सरकारची अमृत जल योजना ही खानापूर शहराची तहान भागवणारी ठरणार आहे खानापूर शहराची वाढतीी लोकसंख्या खानापूूर शहरासाठी या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे याबद्दल केंद्र व राज्य सरकार मे खानापूर शहरासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दलयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमई व इतर मंत्र्याचे अभिनंदन करतो. असे विचार मांडले.
यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, खानाप शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता खानापूर शहराचा पाण्याचा प्रश्न या योजनेतुन कायमचा मार्गी लागला. या बदल केंद्र व राज्य सरकारला धन्यवाद देतो.
यावेळी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुंबल,बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आदींनी आपली मते मांडली आदी उपस्थित होते.
संजय कांची यानी प्रास्ताविक केले.तर गुंडू तोपिनकट्टी यानी आभार मानले.