IMG-20230203-WA0044

खानापुर breking: खानापूर मलप्रभा नदी घाटावर आंघोळीसाठी आलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. बुडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव सुनील चंद्रपा तळवार वय 32 राहणार अशोक नगर असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती की सुनील चंद्रप्पा तळवार हे आपल्या कुटुंबासमित नदी घाटावर स्नानासाठी आले होते. दरम्यान कुटुंब ही त्या ठिकाणी घाटावर उपस्थित होते. बाजूलाच सुनील हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला बघता बघता तो पाण्यात बुडत असतानाच आजूबाजूला असलेल्या आणखी काहींनी त्याला जवळ असलेल्या एका पाईपच्या साह्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनीलने बुडताना त्या पाईपचाही आधार घेतला नसल्यामुळे तो लागलीच बुडाला. घटनास्थळी एकच गर्दी झाली. तातडीने खानापूर पोलीस तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर अग्निशामक दल दलाच्या जवानांनी नदीच्या पत्रात शोध कार्य सुरू ठेवले आहे. परंतु दोन तास शोधूनही सायंकाळी पाच पर्यंत मृतदेह सापडला नव्हता. घटनास्थळी खानापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रकाश राठोड अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते पाण्याच्या प्रवाहात बराच वेळ मृतदेहाचा तपास केला परंतु मृतदेह सापडत नसल्याने प्रयत्न सुरूच होते घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश निर्माण झाला आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us