खानापूर : खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्रीमान एन ए पाटील होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्रीमान. पी. आर. गुरव व मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्रीमान. एस. एस. पाटील व मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक श्रीमान कुलकर्णी हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्रा. आय. सी. सावंत यांनी केले. तर प्राचार्य श्रीमान. एन. ए पाटील यांनी पाहुण्यांचे हार घालून स्वागत केले..
यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वर्षाच्या वर्गवार उत्कृष्ट विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. प्रथम वर्ष कला विभाग कुमारी कावेरी बडीगेर प्रथम वर्ष वाणिज्य A. विभाग वैभवी गावडे B. विभाग किमया पाटील द्वितीय कला विभाग पुनम घाडी व श्रुती बेलमकर द्वितीय वाणिज्य A. विभाग सोनाली शहापूरकर व नेहा बावकर B. विभाग प्रिया कुंभार तर सोशल वर्कर कुमारी कांचन निलजकर कॉलेजची उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तेजस्विनी देसाई हिची निवड त्यात आली आहे.सदर विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर 2021-22 या वर्षात टॉपर आलेल्या विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या बक्षीस वितरणाचे वाचन प्रा. टी. आर जाधव यांनी केले. याप्रसंगी पीयूसी प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कॉलेजचे प्राध्यापक एम. आर मिराशी व प्राध्यापिका एम वाय देसाई यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले. व भरभरून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष प्राचार्य एन ए पाटील यानी बारावीच्या विद्यार्थिनीनी अभ्यास कसा करायचा परीक्षेची भीती न बाळगता परीक्षेत यश मिळवा व कॉलेजचा नावलौकिक वाढवा असे उपदेश पर अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना भरभरून शुभेच्छा दिल्या.शेवटी प्राध्यापक. ए. एल. पाटील यांनी आभार मानले व प्राध्यापक एन एम सनदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.