IMG-20230209-WA0011

खानापूर तालुक्यातील श्री साई कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष के पी पाटील यांच्या 55 वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता श्रीमान के.पी. पाटील नगर, गर्लगुंजी रोड बरगाव येथे साई मंगल कार्यालयाच्य आवारात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे डबल केसरी विरुद्ध पैलवान समर्जीत पंजाब केसरी ,(गोलू आखाडा पंजाब) यांच्यात होणार आहे. तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान संगमेश बिराजदार कर्नाटक केसरी विरुद्ध पैलवान राकेश कुमार पंजाब नॅशनल चॅम्पियन यांच्यात होणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कालीचरण सोलनकर महाराष्ट्र चॅम्पियन(गोल्ड मेडल) विरुद्ध पैलवान कीर्तीकुमार कार्वे, कंग्राळी यांच्यात होणार आहे.


या कुस्ती आखाड्याला परमपूज्य गोपाळ महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कुस्त्या आखाड्याला शिवसेनेच्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी खानापूर तालुक्यातील कुस्ती प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई कृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. आहे.

श्रीमान के.पी.पाटील समाजसेवी युवा नेतृत्व
खानापूर तालुक्यातील वड्डेबैलं येथील एका सदन कुटुंबात कृष्णाजी पुंडलिक पाटील उर्फ श्रीमान के. पी. पाटील यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील एक सीमा सत्याग्रही व समाजसेवेतील जाणते व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.अशा सदन कुटुंबामध्ये के. पी. पाटील यांचा जन्म झाला. आईच्या छत्रछायेखाली वाढताना त्यांनी अनेक कटू अनुभव आपल्या जीवनात भोगले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर साधक बाधक उद्योग करत त्यांनी बेळगाव गाठले. बेळगाव येथील भाजी मार्केटमध्ये हमाली पासून मार्केटिंग एजंट पर्यंत त्यांनी कार्य केले. त्यानंतर त्यांनी बिल्डर व्यवसायामध्येही आपला सहभाग घेतला. के. पी पाटील यांनी स्वतः अनुभवाच्या जोरावर अनेक माणसे जोडली आहेत. शिवाय समाजात समाजसेवेचे काम करत असताना गोरगरिबांच्या साठी सामूहिक विवाह सोहळा गेल्या चार पाच वर्षापासून हाती घेऊन त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. बरगाव नजीक उभारण्यात आलेल्या के. पी .पाटील नगरात प्लॉट उभारून एक नवीन वसाहत निर्माण करण्याचा त्यांचा पायंडा मार्गी लागला आहे.सुंदर असे साई मंदिर या ठिकाणी उभारले आहे. शिवाय मंगल कार्यालयाची उभारणी करून गोरगरिबांच्या साठी त्यांनी उचललेले पाऊल अभिनंदन आहे. अशा के पी पाटील यांचा 55 वा वाढदिवस आज दिमाखात करण्याचा हेतू त्यांच्या मित्रपरिवाराने हाती घेतला आहे. याला खानापूर तालुक्यातील कुस्ती संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही चांगली साथ दिली आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता भव्य असा कुस्ती आखाडा बरंगाव नजीकच्या के पी पाटील नगर मध्ये हाती घेण्यात आला आहे. या ठिकाणी त्यांचा वाढदिनाच्या निमित्ताने भव्य सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशा श्रीमान के. पी. पाटील यांच्या या कर्तुत्वान कार्यास सलाम तसेच त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुख समृद्धी समाधान व समाजसेवेचे व्रत घडो हीच सदिच्छा.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us