खानापूर: कुपटगिरी येथे 86 वा श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह 31जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने हभप पुंडलिक पाचंगे असोगा यांच्या अधिष्ठनाखाली सोहळ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 02 फेब्रुवारी रोजी या सप्ताहाची महाप्रसादाने सांगता झाली.
यावेळी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी सदिच्छा भेट देऊन श्री पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला. यावेळी ग्रामस्थ पंच कमिटी वारकरी मंडळींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पांडुरंग अखंड नामस्मरण सप्ताह तीन दिवस चालत असलेल्या या सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल हलगेकर यांचे या सप्ताह सोहळ्याच्या नियोजनाबरोबर गावातील मंदिरांच्या विकासासाठी सदोदित प्रयत्न राहिले आहेत. शिवाय आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊन पंढरपूर निवासस्थानी सुद्धा भेट दिली होती. याकामी विठ्ठलराव हलगेकर सरांनी एक लाख रुपये आपल्या स्वखर्चाने त्या निवासस्थानाला रोख एक लाख रुपये दिले आहेत. आज सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी मंदिरला भेट दिली. सर्व गावकऱ्यामार्फत स्वागत करण्यात आले.यावेळी विठ्ठल हलगेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पंच कमिटी सदस्य रवळू शंकर पाटील,ज्योतिबा बाबाजी पाटील, अर्जुन विष्णू पाटील होते. कार्यक्रमाची सांगता दुपारी महाप्रसादाने सांगता झाली.पांडुरंग अखंड नामस्मरण सप्त्याला महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक तसेच महालक्ष्मी शुगर फॅक्टरी चेअरमन व भारतीय जनता पार्टी बेळगाव जिल्हा कार्यकारी सदस्य विठ्ठलराव हलगेकर यांची उपस्थिती होऊन त्यांनी दर्शन घेतले व सदिच्छा भेट दिली
पंच कमिटी ,पंच कमिटी सदस्य रवळू शंकर पाटील, ज्योतिबा बाबाजी पाटील, पिकेपीएस संचालक शंकर बाळाराम पाटील, पीडिओ हनुमंत विष्णू पाटील, विठ्ठल नारायण पाटील, सूर्याजी पाटील, सुभाष पाटील, बाळू पाटील, असेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पंच कमिटी उपस्थित होते.